या मंदिरात दर वर्षी बदलली जाते देवाची मूर्ती (The idol of God is changed every year in this temple)

या मंदिरात दर वर्षी बदलली जाते देवाची मूर्ती (The idol of God is changed every year in this temple)

आपला भारत देश वेगवेगळ्या भौगोलिक व सास्न्स्कृतिक विविधतेने नटलेला देश म्हणून मानला जातो. असे म्हणतात दर ५-१० कोस अंतरावर इथली बोली भाषा बदलत असते. तसेच काही अंतरानंतर तेथील रहिवाशींची रीतभात सुद्धा बदलत जाते. भारतात सर्वत्र एक गोष्ट प्रकर्षाने समान जाणवते ते म्हणजे देव पूजेसाठी व पूजा अर्चानासाठी प्रत्येक गावातील मंदिरे. आपल्या देशात खूप सारे असे मंदिरे आहेत ज्यांची पौराणिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तसेच ही सर्व मंदिरे तेथील परीसारतील व आसपासच्या लोकांसाठी श्रद्धा व आशेचे एक महत्वाचे स्थान आहे. काही मंदिरांचा वेगवेळ्या पुराणात उल्लेख आढळतो, तर काही मंदिरांचा इतिहासात नोंदी सापडतात. भारत देशावर वेगवेगळ्या शासकांनी आक्रमण केले व राज करणे किंवा लुट मार करणे ह्याहेतुने मंदिरांची नासधूस केली हा इतिहास सर्व श्रुत आहे. तरी सुद्धा भारतातील सनातन परंपरा व त्याचे पालनकरते हे सदैव आपल्या श्रद्धा व देवावरील आपला विश्वास कायम ठेऊन आपली परंपरा जपताना आपल्याला नेहमी आढळतात.

भारतातील प्रत्येक मंदिर व देवस्थान आपल्या लौकिकामुळे व त्याच्या ऐतिहासिक वारसामुळे प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे पौराणिक महत्व व संदर्भ धारक आहेत. त्यातील देवाची मूर्ती किंवा शिवलिंग ची स्थापना पौराणिक काळात देव अवतार यांच्या हातून झाले आहेत किंवा देवांनी त्याठिकाणी आपल्या भक्तांना प्रकट होऊन दर्शन दिले आहेत, अश्या देवस्थानांना …….. म्हणून संबोधले जाते. ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे ह्या मंदिरातील उत्सवमूर्ती किंवा देवाची प्रतिमा ही सुरुवाती पासून तीच आहे किंवा जीर्नोधार झाल्यावर बदल केल्या नंतर स्थापित केलेली मूर्ती आहेत तीच आहे. देवाची मूर्ती नेहमी जशी आहे तशीच देऊळात कायम असते. पण कोकणात एक असे ही मंदिर आहे ज्यात ग्रामदैवतेची मूर्ती ही दर वर्षी बदलली जाते.

काय बोलता !! तुम्हाला माहित नाही असे मंदिर ज्यात दरवर्षी ग्राम दैवतेची मूर्ती बदलली जाते. तर मग चला जाणून घेऊयात अश्या मंदिर व तेथील परंपरा बाबत.

गीरीजीनाथ देवस्थान मंदिरात दर वर्षी बदलली जाते देवाची मूर्ती (The idol of God is changed every year in the Girijanath temple)

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली ह्या गावातील गीरीजीनाथ देवस्थान ह्या मंदिरात ग्रामदैवत ‘बिरोबा’ यांची मूर्ती फणसाच्या झाडाच्या खोडापासून तयार केली जाते. व दरवर्षी मोठ्या उत्सवाने नवीन मूर्ती मंदिरात स्थापित करण्याची ह्या मंदिराची व गावाची परंपरा आहे. गावातील सर्वाधिक रहिवासी हे शेतीवर अवलंबित आहेत येथे प्रामुख्याने भात, काजू व फणसचे उत्पन घेतले जाते. परंतु फणसाच्या झाडाला येथे सर्वाधिक महत्व आहे. त्यातही जी फणसाची झाडे सरळ वाढतात त्यांना अनन्य साधारण महत्व आहे. सरळ वाढत जाणारी फणसाची झाडे देवाची झाडे म्हणून बोलली जातात व अशी झाडे शेतकरी मोठ्या भक्तिभावाने व झाडांची विशेष काळजी घेऊन ती वाढवत असतात.

दर वर्षी उत्सवाच्या वेळेस सर्व गावकरी व मंदिराचे मानकरी मिळून गावातील फणसाच्या एकूण झाडामधून एक विशेष झाडाची नवीन उत्सवमूर्ती किंवा देव म्हणून एकमताने निवड करतात.   सदर निवडलेले झाड ज्या व्यक्ती कडे असेल ती व्यक्ती मोठ्या भक्तिभावाने हे झाड देवाला अर्पण करते.  उत्सवाच्या दिवशी मंदिराचे मानकरी व ग्रामस्थ सर्व मंदिरात जमा होतात व तेथून जेथे झाड असेल तिथे मंदिराच्या निशाण काठी व झाडाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य सह वाजत गाजत जातात. झाडाची यथासंग पूजा अर्चना करून सदर झाड देवाच्या उत्सव मूर्ती साठी तोडले जाते. तोडलेल्या झाडापुढे सुद्धा सर्व गावकरी श्रद्धापूर्वक व भक्ती भावाने नतमस्तक होतात. नंतर तोडलेल्या झाडाच्या खोडापासून देवाची मूर्ती बनविण्यासाठी काही गावकरी एकत्र येऊन त्या खोडापासून मूर्ती बनविण्याची तयरी करतात. खोडापासून लांब व सरळ अशी मूर्ती बनवली जाते, मूर्ती तयार झाल्यावर सदर उत्सव मूर्ती मोठ्या भक्तिभावाने उचलून घेत वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने देवाच्या मंदिरात आणली जाते. झाडाच्या ठिकाणापासून ते मंदिरा पर्यंत सदर खोडापासून बनविलेली मूर्ती सर्व ग्रामस्थ आप-आपल्या खांद्यावर उचलून घेऊन येत असतात. असे म्हणतात गावातील काही ग्रामस्था देवा कडे आपले गाऱ्हाणे सांगून उत्सव मूर्तीला खांदा लावणार असल्याचे नवस सुद्धा मानतात. म्हणून उत्सव मूर्तीच्या मिरवणुकीत खांदा लावणाऱ्या व्यक्ती मध्ये मोठी चढा-ओढ अनुभवयास मिळते.

मंदिरातील आधीच्या मूर्तीची जिथे स्थापना केली होती तिथून ती जुनी खोडापासून बनविलेले जुनी मूर्ती काढली जाते व त्याच ठिकाणी नवीन उत्सव मूर्ती पुनःप्रतिस्थापना केली जाते. त्यानंतर मंदिराचे मानकरी नवीन स्तापित केलेल्या देवाची विधिवत पूजा करतात व त्यानंतर समस्त गावकरी सुद्धा नवीन देवाची मोठ्या भक्ती भावाने व अनंत श्रद्धेने पूजा अर्चना करतात. तदनंतर पुढील वर्षभर ह्याच नवीन उत्सव मूर्तीची म्हणजेच ग्राम्दैवातेची पूजा अर्चना केली जाते. जो पर्यंत पुढील वर्षी परत नवीन एखाद्या फणसाच्या झाडाच्या खोडापासून नवीन देव बनवून मंदिरात स्थापित केला जात नाही तो पर्यंत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Scroll to Top