शेतीचा नकाशा आपल्या एक क्लिक वर (Agri map on one click)

शेतीचा नकाशा आपल्या एक क्लिक वर (Agri map on one click)

काय तुम्हाला माहित आहे का, आपल्या शेतीचा नकाशा आपल्या एक क्लिक वर (Agri map on one click) आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग ते कॉमप्युटर वर असो किंवा मॉबाईल स्क्रीन वर पाहायला मिळू शकते फक्त एका क्लिक वर.

आपल्या पूर्वजांची जमीन किंवा शेत कुठे आहे आणि त्याचा नकाशा कसा आहे, आधी ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या गावी जाऊन तिथल्या कर्मचारी कडून सरकारी दप्तरातून शेतीचा नकाशा मिळवावा लागत असे. किंवा गावाच्या संबंधित तालुक्याच्या तहसील किंवा महसूल विभागाच्या दप्तरातून आपल्याला हव्या असलेल्या शेताचा नकाशा मिळवावा लागत असे.

पण आता आपल्याला हवा असलेला नकाशा मिळविणे झाले आहे अत्यंत सोपे आणे तेही आपल्या एक क्लिक वर. तुम्हाला माहित आहे का आपणा कसा आणि कुठे मिळवू शकतो आपल्या शेताचा नकाशा आपल्या एक क्लिक वर.

आपल्या हव्या असलेल्या शेतीच्या नकाशा साठी आपल्या काही प्राथमिक बाबींची माहिती असणे आवश्यक आहे जसे की, आपण ज्या शेतीचा नकाशा शोधात आहोत ती शेती किंवा जमीन नेमक्या कोणत्या गावाच्या दप्तर नोंदी मध्ये आहे, त्या गावाचा संबंधित तालुका व जिल्हा कोणता आहे. आणि जर हे पण माहित नसेल तर गुगल मेप वरून आपली जमीन किंवा शेताचा परिसीमा किंवा काही खुणा (आजूबाजूला असलेला रोड किंवा रस्ता, नदी किंवा ओढा) याचा थोडा अनुमानित अंदाज करून घ्यावा.

कसा शोधायचा नकाशा (How to Find Agri Map)

 

शेतीचा नकाशा शोधण्यासाठी आपल्या सर्वात आधी https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वर जावे लागेल.

 

डाव्या हाताच्या साईड ला एक मेन्यू आपल्या दिसेल तेथे  राज्य  (state) साठी महाराष्ट्र (Maharashtra) आधी पासून निवडलेले असेलेच.

त्याखाली केटेगरी (Categary) मध्ये रुरल (Rural) किंवा अर्बन (urban) निवडण्याची गरज आहे. आपण शेती संबंधित नकाशा शोधत असल्यामुळे रुरल (Rural) हा पर्याय निवडावा.

त्याखाली जिल्हा (District) निवडण्याचा पर्याय आहे. त्यात जाऊन आपण आपला संबंधित जिल्ह्याचे नावाचा पर्याय निवडावा.

त्याखाली तालुका (Taluka ) निवडण्याचा पर्याय आहे. त्यात जाऊन आपण आपला संबंधित तालुक्याचे नावाचा पर्याय निवडावा.

आपला तालुका निवडल्यावर खाली संबंधित तालुक्यातील गावांची (Villages) ची यादी ड्रोपडाऊन द्वारे आपल्या पाहायला मिळू शकते. आपल्या गावाचे नाव ड्रोपडाऊन यादीत शोधून निवडून घ्यावे.

जिल्हा, तालुका व नंतर गावाचे नाव निवडल्यावर संबंधित गावाचा वेगवेगळ्या गट रचने नुसारचा संपूर्ण गावाचा नकाशा आपल्या स्क्रीन वर आपल्याला पाहायला मिळतो. सदर नकाशा आपण आपल्या सोयी नुसार स्क्रीन वर लहान व मोठा करूनही पाहू शकतो. जर आपल्याला आपला शेतीचा किंवा जमिनीचा गट क्रमांक माहित असेल तर खाली search plot no. च्या रकान्यात आपला गट क्रमांक नमूद करून सर्च बटन वर क्लिक करावे.

संबंधित गटातल्या सर्व क्षेत्राची माहिती आपल्याला खाली दिसायला भेटते. सोबतच जर त्या गटात २ किंवा त्यापेक्षा जास्त भागधारक म्हणजेच जमीन मालक असतील तर त्यांचे नवे किती जमीन आहे हे सुद्धा आपल्याला पहावयास मिळते. म्हणजे एकूणच त्या गटाबद्दल व त्याच्या मालकी हक्का बाबत आपल्याला संपूर्ण माहित पहावयास मिळते. ह्या वेबसाईट वर उपलब्ध असलेली माहिती शासकीय कार्यालयाद्वारे अद्ययावत (update) केली जाते. त्यामुळे काही अपवाद वगळता उपलब्ध असलेली  माहिती ही अचूक व खरी असते.

चला तर मग  शोधूयात आता तुमच्या मनातील शेत जमिनीचा नकाशा ह्या सोप्या पद्धतीने.

हा लेख जर आपल्याला आवडला तर आपले मत कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Scroll to Top