“काय बोलता” हे इन्फो विजनरी (Info Visionaries) ह्या समूहाचा एक सामुहिक प्रकल्प आहे. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायिक जसे की.. वकील, डॉक्टर, शिक्षक, चार्टर्ड अकौंटंट, मार्केटिंग अधिकारी, शेती व्यावसायिक यांचा समावेश आहे.
इन्फो विजनरी समूहाचे मुख्य उद्देश्य आपल्या कडे असलेले ज्ञान व कौशल्य समाजाच्या हितासाठी पसरवण्याचे आहे. समूहाचे प्राथमिक लक्ष युवक आणि तरुण विद्यार्थी यांच्यावर आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनात, अभ्यासक्रमात व करियरच्या दिशेने विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आमच्या इन्फो विजनरी च्या सभासदांच्या वैक्तिक व्यावसायिक अनुभवद्वारे आम्ही त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत.
इन्फो विजनरी एकत्रितपणे पुढच्या पिढीला सक्षम बनविण्यासाठी आणि समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
ह्या सत्कर्मी आपण सर्व वाचक, हितचिंतक यांचे सहकार्य मिळावे ही अपेक्षा, धन्यवाद !!
टीम इन्फो विजनरी.