क्रिकेट डक (Cricketing Ducks)

क्रिकेट डक (Cricket Ducks)

आज आपण जाणून घेणार आहोत क्रिकेट डक (Cricket Duck) बद्दल, आणि क्रिकेट म्हणजे,… क्रिकेट म्हणजे आपल्या भारतीयांचा प्राण, धर्म आणि जिवनाचा आधार आहे. जगातील खूप सारे देश क्रिकेट खेळत आले आहेत आणि खेळत आहेत. क्रिकेट हा जेन्ट्लमेन्स गेम म्हटलं तर गोऱ्या साहेबांचा खेळ म्हणून ओळखला जातो. इतिहासात गोरे साहेब म्हणजेच इंग्रज, इंग्लंड देशाचे राजघराणे आपले विस्तारवादी धोरण घेऊन वेगवेगळ्या देशांवर व्यापाराचे कारण घेऊन नंतर त्यादेशावर राज करणे शुरू केले. एके काळी अर्ध्यापेक्षा जास्त जगावरील देशांवर इंग्लंड च्या राज्घाराण्यचे राज्य होते. इंग्लंड राजघराण्यासाठी त्यांचे सैन्य अधिकारी त्या त्या देशात कार्यरत असत, ज्यांना इंग्लिश ऑफिसर्स म्हटले जात असे. हे इंग्लिश ऑफिसर्स सुटीच्या दिवशी करमणुकीसाठी एकत्र येऊन क्रिकेट खेळत असत. नंतरच्या काळात स्थानिक सैन्य अधिकारी यांनाही त्यांनी आपल्या या खेळात सामील करून घेतले. अशा प्रकारे क्रिकेट ह्या खेळाचा प्रचार आणि प्रसार अख्या जगभर खास करून जेथे जेथे इंग्रजांचे राज्य होते.

आज आपण जाणून घेऊयात क्रिकेट मध्ये वापरल्या जाणाऱ्या एका शब्दाबद्दल जो आहे. डक (Duck)

Cricketing Duck – क्रिकेट डक ह्या शब्दाची सुरुवात खरतर इंग्लंडमध्येच झाली, तर गोष्ट आहे ई.स. १८६६ साली एका प्रदर्शनीय सामन्यात जेथे वेल्स चे राजा  एडवर्ड सातवा (Edward 7th)  पण क्रिकेट खेळत होते. पण राजा पहिल्याच चेंडूवर एक ही रन न बनवता आउट झाला. हताश आणि स्वतःशी निराश झालेले राजे परत जात असताना उदासीनपणे व संथ गतीने जात होते. त्यांना तसे जाताना पाहून लोक म्हणाले राजे तर बदका सारखे चालत आहेत (He is walking like a Duck). दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रात बातमी आली King Out on Duck आणि बस क्रिकेटला मिळाला एक नवीन शब्द डक (Duck) म्हणजे शून्यावर आउट होणारा.   तुम्हाला माहित आहे क्रिकेट मध्ये एकूण किती प्रकारचे डक असतात. नाही माहित तर मग चला जाणून घेऊयात क्रिकेटचे डक बद्दल.

क्रिकेट डक (Cricket Duck) एकूण किती प्रकारचे असतात.

डक आउट : डक आउट म्हणजे कुठलाही फलंदाज म्हणजेच बेट्समन एकही धाव न घेता आउट झाला तर त्याला डक आउट म्हणतात.

गोल्डन डक : जर  बेट्समन एकही धाव न घेता पहिल्याच चेंडू खेळताना आउट झाला तर त्याला गोल्डन डक आउट म्हणतात.

सिल्वर डक : जर  बेट्समन एकही धाव न घेता  दुसरा चेंडू खेळताना आउट झाला तर त्याला सिल्वर डक आउट म्हणतात.

ब्राँझ डक : जर  बेट्समन एकही धाव न घेता  तिसरा चेंडू खेळताना आउट झाला तर त्याला ब्राँझ डक आउट म्हणतात.

डायमंड डक : जर  बेट्समन एकही धाव न घेता तर काय एक ही चेंडू न खेळता आउट झाला तर त्याला डायमंड डक आउट म्हणतात. ह्याच्यात बेट्समन एकतर रन आउट होऊ शकतो किंवा वाईड बोल वर स्टंपआउट होऊ शकतो.

रॉयल डक : अति प्रतिष्ठेची मानली जाणारी असेश टेस्ट सिरीस जी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविण्यात येते. ह्या सिरीस मध्ये जर पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बेट्समन एकही धाव न घेता आउट झाला तर त्याला रॉयल डक आउट म्हणतात.

प्लेटीनम डक : क्रिकेट सिरीस मध्ये जर पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बेट्समन एकही धाव न घेता आउट झाला तर त्याला प्लेटीनम डक आउट म्हणतात.

लाफिंग डक : क्रिकेट मेच मध्ये जर बेट्समन एकही धाव न घेता आउट झाला आणि त्याची टीम ऑल आउट झाली तर त्याला लाफिंग डक म्हणतात.

हे पण वाचा :

क्रिकेटचा भगवान – सचिन तेंडुलकर (God of Cricket – Sachin Tendulkar)

पैर डक : टेस्ट मेच मध्ये जर पहिल्या  व दुसऱ्या इनिंगमध्ये बेट्समन एकही धाव न घेता आउट झाला तर त्याला पैर डक आउट म्हणतात.

किंग पैर डक : टेस्ट मेच मध्ये जर पहिल्या व दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवर बेट्समन एकही धाव न घेता आउट झाला तर तर त्याला किंग पैर डक आउट म्हणतात.

टाईटेनियम डक : जर ओपनर बेट्समन एकही चेंडू न खेळता आउट झाला तर त्याला टाईटेनियम डक आउट म्हणतात.

बॉम्बे डक : बॉम्बे डक हा खरतर क्रिकेट फोरमेट किंवा इतर प्रचलित प्रकार नाही आहे. नावा वरूनच लक्षात येते की हा प्रकार भारतीय आणि खास करून  मुंबई (बॉम्बे) साठी वापरला गेला आहे. खरतर भारतीय क्रिकेटपटू अजित अगरकर साठी वापरला गेला होता. तर त्याचे झाले असे होते की, आपला मराठी माणूस अजित अगरकर एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळा सलग शून्यावर आउट झाला होता. म्हणून त्याला चिडवण्यासाठी त्याला बॉम्बे डक असे म्हटले जायचे. जेव्ह्या सात वेळा सतत शून्यावर आउट झाल्या नंतर आठव्या इनिंग मध्ये अजित अगरकर ने पहिली धाव घेतली ती त्याने शतक झळकावल्या सारखे सेलिब्रेट केले होते.

तुम्ही सांगा, तुम्हाला माहित होते क्रिकेट मधील डक बद्दल, आणि जर आपल्याला वाटते काही राहिले आहे तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Scroll to Top